चाळीसगावातील वाळू तस्करी प्रकरणाचे मंत्रालयात पडसाद; जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे आदेश

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील तितूर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू तस्करी प्रकरणाचे आज मंत्रालयात पडसाद उमटले. महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी जळगावसह राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना वाळू तस्करी रोखण्याचे आदेश दिले आहेत.

तस्करी विरोधात उद्रेक

याबाबत वृत्त असे की, येथील तिथून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाळू तस्करी चा मुंदखेडे येथील ग्रामस्थांनी दिनांक २१ जानेवारीच्या रात्री विरोध करून भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या वाळू तस्करांचे जेसीबी डंपर महसूल प्रशासनास पकडून देऊन कारवाईची मागणी केली. यावरून चाळीसगावचे तसीलदार कैलास देवरे यांचे पथकाने सदर जेसीबी चालक आणि डंपर मालक भाजपचे माजी नगरसेव प्रभाकर पांडुरंग चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून जेसीबी डंपर जप्त करून कारवाई केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली तस्करी याचा एकंदरीत हिशोब पाहता ती जवळपास ३०० कोटी रुपयांच्या वर झाल्याचे निदर्शनास येत असल्याने याप्रकरणी आज मंत्रालयात पडसाद उमटले.

कारवाई करा

महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी एका कॉन्फरन्स दारे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची या विषयावर बैठक घेऊन एका तालुक्यातील एखाद्या नदीत एवढी तस्करी होत असेल तर इतर ठिकाणांचे काय ? असा प्रश्‍न उपस्थित करून या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी चाळीसगाव वाळू तस्कर प्रकरणी जळगाव जिल्हाधिकार्‍यांना कडक कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याचा अर्थ काय ?

२१ जानेवारीच्या रात्री वाळू तस्करी मध्ये डंपर व जेसीबी जप्त होऊन कारवाई झालेला मालक भाजपाचा माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी हा मात्र २२ जानेवारी रोजी खासदार ए टी नाना पाटील व भाजपाच्या पदाधिकार्‍यांबरोबर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरी एक्सप्रेस च्या स्वागतासाठी सर्वांसमवेत हजर होता यामुळे नेमका याचा अर्थ काय याला पाठबळ कुणाचे ही चर्चा शहर आहे.

Add Comment

Protected Content