ग्रेस अकॅडमीचा ९५.६७ टक्के निकाल

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील ग्रेस अकॅडमी इंग्रजी माध्यम शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असुन या वर्षी शाळेचा निकाल हा ९५.६७% टक्के इतका लागला आहे.

ग्रेस अकॅडमीचे यंदा दहावीचे ४६ विद्यार्थी परिक्षेत बसले होते. या पेकी ४४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या मध्ये अल्तमेश शेख ९०.२०% मिळवून प्रथम आला. तर द्वितीय क्रमांक आदित्य शीलेदार (८९.६०%), तृतीय क्रमांक सुशील बागड (८९.४०%), चतुर्थ क्रमांक आर्या मेहता (८७.६०%) आणि पाचवा क्रमांक हेरंभ देशमुख (८७.४०%) हे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक विश्‍वास बारिस यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Add Comment

Protected Content