केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत- प्रमोद पाटील ( व्हिडीओ )

चाळीसगाव जीवन चव्हाण । सध्या इंधनवाढीमुळे कृषीसह सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई कडाडली आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याचा आरोप जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी दिले. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत वाढत्या इंधनाच्या मूल्यावरून चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, इंधन दरवाढीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. अगदी कृषी पदार्थांपासून ते दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तूंचे दर यामुळे कडाडले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला भूलथापा देऊन एकदा नव्हे तर दोनदा सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत.

प्रमोद पाटील पुढे म्हणाले की, भाजपने मूळ मुद्यांना बगल देऊन भावनिक मुद्यांवरून राजकारण सुरू केले आहे. मात्र आता महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे. यातून उद्रेक होऊन देशात क्रांती होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन देखील प्रमोद पाटील यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा प्रमोद पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

Protected Content