गजानन महाराज प्रकट दिनावर कोरोना प्रादुर्भावाच सावट

 

 

शेगांव : प्रतिनिधी ।   कोरोनामुळे शेगावचे गजानन महाराज मंदिरसुद्धा बंद आहे, त्यामुळे आज गजानन   महाराजांचा १४३ वा प्रकट दिन उत्सव भाविकांनी घरी राहूनच साजरा करावा , असे आवाहन संस्थान विश्वस्त मंडळ यांच्याकडून करण्यात आले  आहे,

 

कोरोना  प्रादुर्भावामुळे प्रथमच संत नगरीमध्ये भक्ताविना संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन साजरा होणार आहे..

 

गजानना अवलिया । अवतरले जग तारया।। या उक्तीप्रमाणे माघ वद्य ७ ला १३८ वर्षापूर्वी दिगंबर तरुण रूपात ‘श्रीं’चे पहिले दर्शन झाले तो प्रकट दिवस होता २३ फेब्रुवारी  १८७८ रोजीचा . प्रकट दिनानिमित्त या प्रकटस्थळावरही भाविकांची गर्दी झाली  आहे. या प्रकटस्थळावर संस्थानच्यावतीने आकर्षक संगमवरी नक्षीकाम केलेले ‘श्रीं’चे मंदिर बांधलेले आहे. श्री गजाननाचे वास्तव्य हे १८७८ ते १९१0 पर्यंत होते.  गजाननाचे भक्त प्रतिपालनाचे महान कार्य या संतनगरीत झाले आहे.

Protected Content