चोपडा कोविड रुग्णालयात उद्या ऑक्सिजन पाईप लाईनचे काम सुरू होणार

चोपडा, प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रुग्णालयात अतिशय चांगली व्यवस्था आहे. मात्र, ऑक्सिजनची सुविधा नसल्याने त्यांना इतरत्र हलवावे लागते. यामुळे चोपडा कोविड रुग्णालयातच ऑक्सिजन पाईप लाईनचे वर्गणीतून लावण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा हा मेडीसिन पेक्षाही महत्वाचे असल्याचे व त्यामुळे अडावद येथील एका डॉक्टर मित्राचा मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा डॉ. जुनेद व डॉ. दीपक पाटील यांनी एस. बी. पाटील यांना सांगितले. परंतु, जेव्हा चोपडाच्या डॉक्टरांची झूम बैठक झाली त्यात डॉ. दीपक पाटील,डॉ. दिलीप पाटील,डॉ. लोकेन्द्र महाजन, डॉ. विनीत व डॉ. अमित हे हरताळकर बंधू,डॉ. भाटिया, डॉ. देशपांडे, डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी पेशंटची संख्या कमी करण्याच्या उपायासोबत पेशंट चोपडा येथेच कसा बरा होईल यासह मृत्यू झाल्याचं नाही पाहिजे यावर भर दिला.
त्यानंतर डॉ. पंकज पाटील यांनी चोपडा कोविड सेंटर मध्ये लोकसहभागातून oxygen concentrator आणि प्रत्येक बेड ला O2 ची व्यवस्था जर झाली तर कोरोनाग्रस्त रुग्णांना जळगाव येथे पाठवण्याची शक्यता कमी होईल त्यासाठी अशी पाईप लाईनची व्यवस्था होणे गरजेचे आहे असे सुचवले.

मदतीचा ओघ तो खालीलप्रमाणे….
डॉ महेंद्र जैस्वाल, ए पी आय मनोज पवार,सी. एस. पाटील, डॉ. विनीत/अमित हरताळकर, भरत पाटील (गनपुर/कतार देश), नंदकिशोर सोनवणे, संजय बोरसे, वेलोदे, माजी आमदार कैलास पाटील, सुनील जैन, तहसीलदार अनिल गावित, डॉ. रवींद्र पाटील,पंकज नगर, डॉ. पराग पाटील, चहार्डी, डॉ. सुशील सुर्यवंशी, भागवत महाजन(गोरगावले), डॉ अजय करंदीकर, डॉ. संदीप काळे, चंद्रशेखर करंदीकर(गणपुर/पुणे), इजी विजय पुंडलिक पाटील(अकुलखेडा/मुंबई), डॉ दीपक (साई)डॉ दिलीप नाना, डॉ नरेंद्र शिरसाठ, नारायण पालीवाल, हेमंत पाटील डॉ. भूषण सोनवणे, अड. दिनेश वाघ(बुधगाव),डॉ. राजेन्द्र भाटिया, डॉ. लोकेंद्र महाजन, मयुर शिंदे आदींनी आर्थिक मदत केली आहे. आतापर्यंत ₹१,११,१११/-(एक लाख अकरा हजार एकशे अकरा)रुपये जमा झालेत.ते आज तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे सुपूर्द केलेत.

मुंबई पुण्याला आपला रुग्ण पाठवला तर फक्त एवढ्यासाठी चार ते पाच लाख खर्च येतो मग आपल्या येथे थोडा निधी दिला तर पूर्ण रुग्णालय सुसज्ज करता येईल तरी दानशूर लोकांनी मदत करावी असे आवाहन एस. बी. पाटील यासह सारे कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी मयुर शिंदे,रमाकांत सोनवणे,सी. एस. पाटील,विपीन बोरोले,कुलदीप पाटील,हरिकेश पाटील मेहनत घेत आहेत.

Protected Content