नाभिक समाजातर्फे मंदीरात भाविकांना फराळाचे वाटप

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री. संत सेना नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री. विठ्ठल रुख्मिणी व श्री.संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्ताने उपस्थित भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.

शहरातील शिवाजीनगर भागातील श्री. संत सेना महाराज व श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नाभिक समाज मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्ताने श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी सकाळ पासुन भाविकांनी गर्दी केली होती. श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात स्वराजंली गृपचे संचालक तथा श्रीराम भजनी मंडळाचे सदस्य लक्ष्मण खैरनार यांच्या टीम ने सुमधूर आवाजात विविध भजन सादर करत भक्तिमय वातावरण तयार केले. दुपारी १२ वाजता सामुहिक आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी शिवाजी शिरसाठ यांनी संतसेना महाराज यांच्या मुर्तीस आकर्षक बांधलेला फेटा सर्वाचे लक्ष वेधुन घेत होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अँड. भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्यकारणी सदस्य सुभाष ठाकरे, भगवान नेरपगारे, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, सुर्यभान वाघ, दिलीप नेरपगारे, नितिन शिरसाठ, दयाराम ठाकरे, काशिनाथ शिरसाठ, प्रल्हाद ठाकरे, चेतन पवार, नरेंद्र भास्कर मोरे सह सर्व समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.

Protected Content