हिंगोणा मुख्यमंत्री पेयजल योजनेचे वाजले तिन तेरा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  हिंगोणा गावात पाच जलकुंभ असून त्या जलकुंभांना चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाल्यामुळे त्यांची मुदत जवळपास संपुष्टात आली आहे.  हे  जलकुंभ तात्काळ पाडून नवीन जलकुंभाचे बांधण्यात यावे अशी मागणी  ग्रामस्थ  ग्रामपंचायतीला नेहमी करीत होते.

 

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने सन १७-१८ या कालावधीमध्ये शासनाला पत्र दिले की, मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत गावात नवीन जलकुंभाची उभारणी करावी. गावात सन १८ – १९ या वर्षात १ लाख लिटरचे पेयजल क्षमतेचे जलकुंभ या योजनेतुन मंजूरी मिळाली होती. हिंगोणा ग्रामपंचायतीने रितसर जागेचा ठराव पाठवून हे जलकुंभ वि. का. सोसायटी परिसरात उभारणीचे काम सुरुवात झाली.  परंतु, काही ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यावल यांच्याकडे अर्ज दिले की ठेकेदार हे कामावर पाणी मारत नसून या संपूर्ण लाखो रुपयांच्या निधीतुन बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाचे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी तीन महिने काम बंद केलेले होते. मुख्यमंत्री पेयजल योजना ही ४७ लाख ३५ हजार अंदाजित रक्कम आहे. या योजनेत डोंगर हाड र्चौकातील २ लाख लिटर जलकुंभाची दुरुस्ती करणे, गावात पाणी वितरण व्यवस्था करणे, नवीन एक लाख लिटर जलकुंभाला तार कंपाऊंड करणे असे काम या योजनेत आहे. परंतु, बराच कालावधी उलटल्यावर देखील एकही काम झालेले नाही. फक्त पिण्याच्या टाकीचा नुसता सांगाडा उभा केलेला दिसत आहे.  गावास उन्हाळ्यात किंवा हिवाळात पाण्याची टंचाई असल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मागील चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेजल योजनामंजूर होऊन आज तीन वर्षे पूर्ण होत आहे. तरी देखील या योजनेचे काम अपूर्णावस्थेत असून भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना या योजनेचा काय फायदा असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.  पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत असून ते पूर्ण न करता पाईपलाईनचे काम ज्या भागात पाहिजे त्या भागात केली नाही ती पाईपलाईन दुसऱ्याच भागात केली गेली आहे. पण ते सुद्धा मोजकीच केलेली आहे.

Protected Content