तांबापूऱ्यातील मच्छीबाजार येथे दोन गटात हाणामारी व दगडफेक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारीत दगडफे करण्यात आल्याची घटना तांबापूरा येथील मच्छीबाजार येथे घडली होती. यात एकजण जखमी झाला आहे. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरा भागातील मच्छीबाजार येथे घरासमोर बसण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुफाण हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मच्छिबाजार येथे घडली होती. मारहाणीत दगड आणि दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. यात जुबेर उर्फ सिंगाड्या यासीन खाटीक खाटीक हा तरूण जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

दरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी होत असल्याचे माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोकॉ.  रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मंदार पाटील, इमरान रहीम बेग यांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहिम बेग यांच्या फिर्यादीवरून बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जुबेर उर्फ सिंगाड्या यासीन खाटीक, शेख रईस शेख रशीद, अश्पाक शेख, रवींद्र राजू हटकर, राकेश उर्फ डॉलर धनराज हटकर, अतिश उर्फ वास्तव हटकर, तोब्यात धनराज हटकर सर्व राहणार तांबापुर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

Protected Content