यावल येथे शिवराज्यभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  हिन्दवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे एतिहासिक शिवराज्यभिषेक दिन एक दिवस महाराजांसाठी म्हणुन शहरातील युवकांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 

यावल शहरातील प्रमुख मार्गाने तरुण युवकांच्या वतीने रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराजांची पालखी लहान मुलांचे झांज पथक, डोक्यावर कळस घेवुन महीलांचा सहभाग, शिवकालीन वेशभुयेत लहान मुलांची दिंडी, अष्टप्रधान मंडळ, घोडयावर छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ व संभाजी राजे यांच्यासह युवकांचे झांज पथक अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली.

 

या शोभायात्रेचा समारोप शहरातील राजे निबांळकर यांच्या एतिहासीक किल्ल्यावर शिवरायांचा शिवराज्य अभिषेक सोहळा विधीवत पुजा यावलचे आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्याहस्ते यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली.  या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन कौस्तुभ पाटील व अभिषेक जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन शशीकांत वारूळकर व कैलास माळी यांनी केले. या संपुर्ण शिव राज्य आभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी डॉ. अभय रावते, योगेश वारूळकर, धनंजय बारी, निलेश पाटील, दिपक वारूळकर प्राची पाठक, अॅड गोविंद बारी, सागर चौधरी, राजेश श्रावगी, मयुर महाजन, लोकेश वाड, पवन खरचे, यशवंत काटकर आदी तरूणांनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!