पिंपरुडच्या ऑइल मिलला आग ; १४ लाखांचे नुकसान (व्हिडीओ)

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पिंपरुड येथील जगवानी ऑइल मिल मध्ये काल 27 रोजीच्या मध्यरात्री शॉर्टसर्किट मुळे आग लागून सुमारे 14 लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर जमा करून ठेवलेली सरकी तसेच ढेप तयार करणारी मशिनरी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.

पिंपरुड सावदा रस्त्यावर आनंद जगवानी यांची जगवानी ऑईल मिल असून या ऑईल मिलला मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट मुळे आग लागली. आगीमध्ये ढेप बनवण्यासाठी लागणारी सरकी तसेच ऑईल मिलची मशिनरी जाळून खाक झाली आगीची माहिती मिळताच जळगाव येथे राहणारे ऑईलमिलचे मालक घटनास्थळी दाखल झाले फैजपूर नगरपालिका आणि सावदा नगरपालिकेचा अग्निशमन बबांनी तसेच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली आगीची माहिती मिळताच फैजपूरचे नगराध्यक्ष निलेश राणे सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत कार्य करण्यास सहकार्य केले.

.पोलिसात आशिष जगवानी यांनी दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद घेण्यात आली आहे . पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे .तपास सपोनि प्रकाश वानखडे व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/626475511343363/

Protected Content