अरे देवा ! मान्सून लांबण्याची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात उष्णतेची भीषण लाट सुरू असतांना मान्सूनचे आगमन अजून विलंबाने होण्याचे संकेत मिळाले आहेत.

यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले होते. या अनुषंगाने मान्सून २९ तारखेला केरळमध्ये दाखल झाला होता. तर ३ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी असे झाले नाही. आगामी ७ ते १० दिवसांमध्ये म्हणजेच १२ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे हे अरब समुद्र, बंगालची खाडी, केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागात दाखल झाले आहेत. तर, मध्यम ते कमी प्रमाणात कोकण, मध्य महाराष्ट्र घाट भागात पुढील २-४ दिवसात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि संपूर्ण राज्यात मात्र मान्सून विलंबाने दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content