ॲक्सीडेंट : उभ्या ट्रकला कार धडकल्याने एक जागीच ठार; दोन गंभीर जखमी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवानंद ढाब्याजवळ उभ्या ट्रकवर कार धडकल्याने कारमधील एकजण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरापासून जवळ असलेल्या शिवानंद ढाब्याजवळ ट्रक (सीजी ०४ जेडी ०२८२) सोमवारी ६ जून रोजी दुपारपासून थांबलेला होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव कार क्रमांक (एमएच २० सीएस १३८४) क्रमांकाची कार उभ्या ट्रकवर जोरदार धडकली. या कारमधील चंद्रकांत नामदेव पाटील (वय-४५) रा. नगाव ता.धुळे हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सोबत असलेले अशोक तोरवणे (वय-४८) आणि सतीश हेमचंद्र चौधरी (वय-४७) दोघे रा. शिंदखेडा हे गंभीर जखमी झाले.

 

अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिक तथा जिल्हा परिषदेचे नाना महाजन यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील पंकज पाटील राजेश पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!