ब्रेकींग : शौचालय घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार पोलीसांना शरण

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीत शौचालय योजनेच्या भ्रष्टाचारातील फरार असलेला मुख्य संशयित आरोपी हा आज सकाळी रावेर पोलीसांना शरण आला आहे तर दुसरा संशयिताला अजंदे गावातून पोलीसांनी अटक केली आहे. आता आरोपींची संख्या आठ वर पोहचली आहे.

 

काय आहे हे प्रकरण

रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर अपहार झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे फरार होते. रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा टेक्निकल, तांत्रिक व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु होता. अखेर या भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलेले आरोपींच्या अटकसत्रला सुरुवात झाली आहे.

 

आतापर्यंत यांना केली अटक

या प्रकरणी काल रात्री उशिरा पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा पाडळा बु), बाबुराव संपत पाटील रा. विवरे बुद्रुक ता. रावेर, रुबाब नवाद तडवी, हमीद महेमुद तडवी दोन्ही रा. पाडळा यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी मुख्य आरोपी समाधान निंभोरे हा रावेर पोलीसांना शरण गेला आहे. तर दुसरा फरार असलेला आरोपी विलास सावकारे याला देखील ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत आरोपींची संख्या ८ वर  पोहचली आहे.

 

आता मुख्य आरोपी समाधान निंभोरे यांच्याकडून महत्वाची माहिती मिळणार असून शौचालय योजनेच्या एवढ्या मोठ्या रकमेचा व्हिलेवाट निंभोरे यांनी कशी लावली ?, रावेर पंचायत समितीतील अजून कोणकोण अधिकारी अधिकारी व पदाधीकाऱ्यांचा या भ्रष्टाचारात सहभाग आहे हे लवकरच जनतेसमोर येणार आहे.

Protected Content