संत मुक्ताई चरित्र लेखनाबद्दल डॉ.जगदीश पाटीलांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी । श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथेत संत मुक्ताई चरित्र लेखनाबद्दल डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांचा फैजपूर येथील 27 कुंडीमहाविष्णूयाग महोत्सव, गाथा पारायण व नामसंकीर्तन सप्ताह सद्गुरु जोग महाराज शताब्दीनिमित्त आयोजित सप्ताह महोत्सवात स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

मेहूण-चिंचोल येथील रहिवासी तथा संत मुक्ताई आरतीचे रचियाता अॅड. गोपाल दशरथ चौधरी यांनी लिहिलेल्या श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गाथेत संत मुक्ताई चरित्र लेखन व संत मुक्ताई अभंगांचे संकलन करण्याचे काम करणारे भुसावळ येथील रहिवासी व व बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन रावसाहेब विलास नेमाडे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून योगी पावन मनाचा मुक्ताई चिंतन ताटीचे अभंग यावर प्रवचन सुरू असून त्यानिमित्ताने हा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीगुरु श्रीहभप प्रसाद महाराज, महामंडलेश्वर पुरूषोत्तमदासजी महाराज, हभप शारंगधर महाराज, नरेंद्र नारखेडे, अॅड. जयवंत बोधले महाराज यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

Protected Content