सावदा रेल्वे स्थानकात कोविड केअर सेंटर सुरू करा : शिवसेनेची मागणी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे डब्यांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नेहते यांनी खासदार रक्षा खडसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नेहते यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आपण रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असून आपल्या मतदार संघात रावेर मुक्ताईनगर , यावल या तालुक्यात कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यामध्ये रुग्णांना वेळेवरती बेड उपलब्ध नसतात.तसेच शासकीय कोविड सेंटर मधेही बेड उपलब्ध नाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या असल्याने आपण पुर्व तयारी म्हणून रेल्वे मार्फत सुरु असलेली रेल्वे डब्यांची कोविड सेंटर सावदा रेल्वे स्टेशन येथे सुरु करावे.

यात पुढे म्हटले आहे की, सावदा रेल्वे स्टेशन हे चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे रेल्वेचे रेल्वे डव्यांचे कोविड सेवा केंद्र करणे करणे उचीत राहिल. या स्टेशनवर गर्दी देखील नसते. येथे माल धक्का असल्याने रेल्वे ये – जा करणार्‍या गाड्यांना याचा त्रास होणार नाही. तरी खासदार रक्षाताई खडसे यांनी या प्रकरणी पाठपुरावा करून सावदा रेल्वे स्थानकावर कोविड केअर सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि ऑक्सीजन सेंटर सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content