पिप्रांळा येथे शिवमहापुराण कथा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील सोनी नगर परिसरात श्री शिव महापुराण कथेत देवदत्त महाराज यांनी एकादश रुद्र तसेच शतरुद्र संहितेचे वर्णन केलं,कार्तिक स्वामींचा जन्माची कथा तसेच भगवान गणपती बाप्पांचे प्रागट्य कथेतून सांगण्यात आले. बुधवारी ३१ जानेवारी रोजी गणपती जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गणपती,शिवकन्या अशोक सुंदरीचा सजीव देखावा करण्यात आला होता.

मोरदे महाराजांनी कथेत निरूपण करतांना सांगितले की, शिव हे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ जाणणारे आहेत म्हणून त्यांना त्रिकालदर्शी असं म्हणतात.स्वतः विष प्राशन करून देवांना अमृत देऊन भगवान शिवानी या संपूर्ण ब्रम्हांडाचे रक्षण केले आहे आयुष्यामध्ये जगाला चांगले द्यावं आणि भगवंताचे चिंतन करावं. घरी पाहुणे येणार म्हटल्यावर जसं आपण घर सुंदर बनवतो स्वच्छ करतो त्याप्रमाणे हृदयात भगवंत यावा यासाठी अंतकरण शुद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे असं कथेतून देवदत्त महाराज यांनी सांगितले आज कथेची सांगता असून श्री शिव महापुराण कथेचे शोभायात्रा दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे उद्या दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा गोपाळ काल्याचे किर्तन संपन्न होऊन शिव महापुराण कथेचा समारोप होईल.

कथेत महाआरती माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, मनसे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, रांजेद्र निकम, विशाल त्रिपाठी ,मांगिलाल गिल यांच्या हस्ते करण्यात आली.

Protected Content