शिवसेनेचे अनोखे आंदोलन : पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या फेकत पोस्टर फाडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे आज शिवासेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात शिव कॉलनी येथील पिक विमा कंपनीच्या कार्यालयात घोषणाबाजी करून करून कार्यालयातील खुर्च्या फेकत पोस्टर फाडून आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील केळी पिक उत्पादक यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केळी पिक विमाचा हप्ता भरूनही विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचे अनुदान आणि रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे आज जळगावातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत पिक विमा कंपनीचे शिव कॉलनी येथील कार्यालय गाठलं आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयातील खुर्च्या बाहेर फेकल्या तसेच पोस्टर फाडून तीव्र संताप व्यक्त केला.

पिक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. ४ फेब्रुवारीच्या आत जर केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर ४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

Protected Content