खेडगाव नंदीच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पंढरीनाथ पाटील विजयी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील (खेडगाव नंदीचे) ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मधील एका जागेसाठी तिरंगी लढतीत शिवसेनेचे पंढरीनाथ पाटील यांनी बाजी मारत एकतर्फी विजयी झाले.

उपसरपंच पदावर असलेले भटेसिंग पाटील यांना सरकारी नोकरी लागल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेसाठी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दि.५ जून रोजी शांततेत मतदान झाल्यानंतर ६ जून रोजी पाचोरा तहसील येथे मतमोजणी संपन्न झाली. या मतमोजनीत एकूण मतदान ७४६ पैकी ४५३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये पुरुष मतदार २५३ तर महिला मतदार २०० असे मतदान झाले. पैकी विजयी झालेले शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती असलेले पंढरीनाथ गोविंदा पाटील यांना ३४९ मते मिळाली. रवींद्र कडुबा कोळी ८१, अजय अभिमन पाटील ११ मते तर नोटाला १२ मते मिळाली. सेनेचे पंढरीनाथ पाटील विजय झाल्याने पाचोरा – भडगावचे आमदार किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, जिल्हा परिषद गटाचे सदस्य पदमसिंग पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, शिवदास पाटील, दिपकसिंग राजपूत, राजेंद्र साळूंके, प्रविण ब्राम्हणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी अभिनंदन केले.

यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी महेंद्र सुखदेव पाटील यांनी कामकाज पाहिले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!