आमच्याबद्दल वाईट बोलाल, तर शांत बसणार नाही- खा. उदयनराजे भोसले

कोण संजय राऊत ? भोसलेंचा कडक इशारा

मुंबई / सातारा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, त्यातच खा. संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली. यावर प्रत्येकाला घराण्याचा अभिमान असतो, आमच्याबद्दल वाईट बोलाल तर शांत बसणार नाही, असा थेट इशारा खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खा.राऊतांना दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील विषय आहे. त्यांच्या उमेदवारीवरून इतरांनी चोमडेपणा करू नये, इतकाच कळवळा असेल तर संभाजीराजेना भाजपाने ४२ दिली असती अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसलेनी छत्रपती संभाजीराजेनी प्रतिक्रियेवर केली होती.

यावरून संजय राऊत कोण आहे माहित नाही, आम्ही कोणाबद्दल वाईट बोलत नाही, पण आमच्याबद्दल जर वाईट बोलाल तर कोणीही शांत बसणार नाही. प्रत्येकाला घराण्याचा स्वाभिमान आहे बाकी काही पेटले तरी चालेल बघतोच असा स्पष्ट इशारा खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे महाराष्ट्र केसरी विजेत्याला बक्षीस वितरण प्रसंगी शिवसेनेच्या राऊतांना दिला आहे.

 

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!