लातूर जिल्हा बँकेत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

लातूर प्रतिनिधी | लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने खळबळ उडाली आहे. तर सरकारच्या दबावात अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

याबाबत वृथ्त असे की, लातूर जिल्हा बँकेत १९ संचालकांच्या पदासाठी निवडणून होत असून यासाठी भाजपकडून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाद केले आहेत. प्रत्येक अर्जात वेगवेगळ्या त्रुटी दाखवून सर्व अर्ज बाद करण्यात आले आहेत.

दरम्यान, सहकार पॅनेलच्या दबावाखाली अधिकार्‍यांनी भाजपाचे अर्ज बाद केले असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. या संदर्भात आपण राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपने दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील ,कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख , जळकोटचे मारोती पांडे , चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आता भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे.

Protected Content