मध्यप्रदेशात पोटनिवडणूक : रावेर येथे दोघा राज्यातील पोलिसांची समन्वय बैठक

रावेर, प्रतिनिधी । शेजारील मध्यप्रदेश राज्यातील नेपगार मतदारसंघातील आमदार सुमित्र कासदेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होऊ घातली आहे. या प्राश्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मध्य प्रदेश पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांची संयुक्त बैठक रावेर आयोजित करण्यात आली होती.

मध्यप्रदेश नेपानगर मतदार संघातून काँग्रेस आय पक्षाकडून निवडून आलेले व नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले आमदार सुमित्रा कासदेकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची जागा रिक्त झाल्याने नेपानगर मतदार संघाचे पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची रावेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय शीतलकुमार नाईक,पीएसआय मनोज वाघमारे, लालबाग पोलीस स्टेशन मध्यप्रदेशचे ठाणा इंचार्जे ए.पी. सिंग, एएसआय तिवारी अश्या अधिकाऱ्यांमध्ये होणारे पोटनिवडणूक संदर्भात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी गुन्हेगारांची माहिती आदानप्रधान करण्यात आली. तसेच दोन्ही राज्याच्या पोलिसात समन्वय राहावा या संदर्भात मीटिंग घेण्यात आलेली आहे.

Protected Content