विविध प्रवेश परिक्षांच्या तारखांची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणार्‍या प्रवेश परिक्षांची घोषणा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.०३ जून ते १० जून, २०२२ रोजी होणार आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.११ जून ते २८ जून, २०२२ तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.१२ जून, २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी १९ मार्च, २०२२ ते १२ एप्रिल, २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक ०३ जून, २०२२ ते १० जून, २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

यासोबत तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी १५ एप्रिल २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षा अंदाजे दिनांक ११ जून २०२२ ते २८ जून२०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणार्‍या सीईटी परीक्षा १२ जून, २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!