आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला प्रकरणी एकाला अटक

हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार प्रज्ञा सातवा यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला आहे. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यवर हल्ला करून घरी बसवण्याचा कट असू शकतो असा आरोप आमदार प्रज्ञा सातव यांनी एबीपी-माझा या वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उशीरा कार्यवाही केल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content