मुंबई , हैदराबादेत ५ – जी मोबाइल टॉवर्स

 

 

मुंबई :  वृत्तसंस्था । ओकलाने दिलेल्या माहितीनुसार देशातील मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांत 5 जी टॉवर लावण्यात आले आहेत. हे टॉवर्स टेस्टींगसाठी लावले आहेत.

मागील कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5G ची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सन 2022 पर्यंत आपल्याला 5G इंटरनेट सेवा वापरणं शक्य नसल्याचं दिसतंय. केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला नसल्यामुळे ही सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. सध्या देशातील दोन शहरांत 5 जी सेवा देणारे टॉवर लावण्यात आले आहेत. 

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात या कंपन्यांनी नागरिकांना 5 जी इंटरनेट सेवा देण्यासाठी काम सुरु केल आहे. मात्र, 2022 पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता नाही. सरकारने 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव न केल्यामुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे. ओकला  या ग्लोबल नेटवर्क मोजणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल आणि जिओ ने भारतातील 2 शहरात 5 जी सेवा देणारे टेस्टींग टॉवर लावले आहेत.

सध्या जगात 5 जी चे एकूण २१ हजार ९९६ टॉवर्स आहेत. त्यातील दोन भारतात आहेत. ओकलाने सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही टॉवर्स हे टेस्टींग फेजमधील आहेत. हैदराबाद येथील 5G ची टॉवरची टेस्ट पूर्ण करण्यात आल्याचे भारती एअरटेलने जानेवारी महिन्यात सांगितलं आहे.

दूरसंचार विभागाने नुकतंच 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात प्रीमियम 700 MHz बँड अजूनही विकले गेलेले नाहीत. सध्या 35 पेक्षा जास्त देशात 5 जीची सेवा सुरु आहे. मात्र, 5 जीची सेवा भारतीयांपासून अजून ८ महिने दूर आहे असे सांगितले जात आहे.

Protected Content