पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावे लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,” असे म्हणाणार नाही. तसेच ये-जादेखील करणार नाही. कायम सत्तेत राहू,” असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

संजय राऊत यांनी भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य केले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. नवे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल,’ असे राऊत म्हणाले. राज्यात आगामी काळात जे सरकार बनेल ते शिवसेनेच्या नेत्रृत्वातच बनेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे. किमान समान कार्यक्रमावर काम सुरु आहे, किमान समान कार्यक्रम ठरल्यावर तो मीडियाला देवू. महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content