जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षानंतर शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामास मागील महिन्यापासून सुरूवात करण्यात आली. मात्र शिवाजी नगरातील स्थानिक नागरीकांसाठी शहरात येण्याजाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना भुयारी रस्ता किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शेख इक्बाल, विलास सांगोरे, मोहसीन शेख, जितेंद्र पाटील, जाहांगिर खान, अजय घेंगट, अफताब आलम, शकील बागवान यांच्यासह पदाधिकारी यांची निवेदनासाठीतहसील कार्यालयात जाऊन रस्ता आणि करण्यासाठी बळीराम पेठेतील भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी यावेळी केली.