धरणगावात शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी यांनी घेतल्या मान्यवरांच्या भेटीगाठी

nilesh chaudhari

धरणगाव, प्रतिनिधी | येथील नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी यांनी आज (दि.१८) शहरातील काही राजकीय पक्षांचे नेते, लहान-मोठे उद्योजक व व्यापारी यांच्या भेटीगाठी घेवून त्यांचे समर्थन मिळण्याची विनंती केली.

 

यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर महाजन, माजी उप नगराध्यक्षा व काँग्रेसच्या नेत्या अरुणाताई कंखरे, यांच्यासह इतर काही नेते, तसेच अनेक मान्यवर उद्योजक व व्यापारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत धीरेंद्र पुरभे, कमलेश बोरसे, विनोद रोकडे, भानुदास विसावे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content