शिवप्रतिष्ठानने फुलांच्या वर्षावात केले समीर वानखेडेंचे स्वागत

मुंबई प्रतिनिधी | शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. तर नवाब मलीक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलीक यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध आरोप केले आहेत. तर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांची पाठराखण केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज शिवप्रष्ठिानतर्फे समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आपल्या समर्थकांसह मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयासमोर दाखल झाले. थोड्याच वेळात समीर वानखेडे ऑफिसमध्ये आले. यावेळी ऑफिसच्या समोरच वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच शिवप्रतिष्ठाकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वानखेडेंना यावेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यादरम्यान, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

दरम्यान, जे अमली पदार्थांचं रॅकेट उध्वस्त करु पाहत आहेत. पण महाराष्ट्रात काही वृत्ती अशा आहेत ज्या वानखेडेंविरोधात आहेत. मी मंत्री नवाब मलिक यांचा निषेध करतो तसंच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतो,  असं नितीन चौगुले म्हणाले.

Protected Content