पहूर येथे शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

पहूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी तिथीनुसार सालाबाद प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विठ्ठल मंदिरा चौकात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पालखी सोहळा शहरातून काढण्यात आला. विठ्ठल मंदिर चौक, गडी दरवाजा, बस स्टँड, सोसायटी चौक होळी मैदान, विठ्ठल मंदिरात पालखीची सांगता करण्यात आली. रात्री हभप नारायण विष्णु महाराज यांच्या कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गणेश पांढरे, तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, विठ्ठल कोंडे, दिलीप बाविस्कर, अशोक महाराज, देवेंद्र घोंगडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय जाधव यांच्यासह शिवप्रेमी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content