पाडळसरे धरणावर सांडव्याच्या प्रस्तंभाचे काँक्रीटींगचे काम सुरू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणावर मुख्य धरणाच्या सांडव्याच्या प्रस्तंभाचे आय आय टी मुंबई व मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांनी तयार करून दिलेल्या सुधारित संकल्पना नुसार सांडव्याच्या प्रस्तंभाचे काँक्रीटींगचे काम सुरू झाले आहे.

यावेळी प्रकल्प तांत्रिक सल्लागार पी. आर. पाटील, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, सहाय्यक अभियंता भटुरकर, कनिष्ठ अभियंता मोदीराज, पगारे व ऋतूल सोनवणे तसेच पाडळसे गावाचे माजी सरपंच भागवत पाटील इतर ग्रामस्थ व कंत्राटदाराचे प्रोजेक्ट मॅनेजर किशोर व अभियंता वर्ग व स्थानिक पत्रकार वसंतराव पाटील उपस्थित होते.

येत्या दोन वर्षात वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेज प्रमाणेच निम्न तापी प्रकल्पाचे सांडव्याचे व धरणाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याची नियोजन असल्याची माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.

Protected Content