


अमळनेर प्रतिनिधी । येथील संत सखाराम महाराज यांच्या पायी वारीचे गुरूवर्य हभप प्रसाद महाराज व अन्य भक्त मंडळीचे अमळनेरात आगमन झाले आहे.
अमळनेर ते पंढरपूर परतीच्या पायी वारीचे आणि गुरुवर्य प्रसाद महाराज यांचे शनिवारी सकाळी संत सखाराम महाराज समाधी मंदिरात आगमन झाले. संत सखाराम महाराज यांच्या समाधी स्थळी वारी सकाळी १० वाजता कारने आल्यानंतर भाविकांनी समाधी दर्शन घेतले. त्यानंतर भजन होऊन वाडी चौकात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दरम्यान, आज अंबरीष टेकडीवर काल्याचे भजन होणार असून १३ जानेवारीला अमावस्या उत्सव साजरा करण्यात येणार आहे.


