शिरसाड जिल्हा परिषद शाळेत पालक मातापिता सभा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत  निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत साकळी केंद्राचे  केंद्रप्रमुख  किशोर चौधरी यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर शिरसाड गावचे उपसरपंच राजू बन्सी सोनवणे, शिरसाड जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली सुभाष इंगळे यांच्यासह माता गटाच्या लीडर भारती रविंद्र खांबायत, ज्योती कैलास ठाकूर,  सविता समाधान मिस्तरी,  मोनाली दीपक खांबायत यांच्यासह इतर अनेक माता पालक याप्रसंगी सभेस उपस्थित होते. यावेळी उपस्थित लीडर माता व इतर मातापालकांना गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी निपुण भारत कार्यक्रमाचा हेतूसह माता गटाच्या निर्मितीचा उद्देश, यामधील लीडर मातांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन करून मातांचे मनोबल वाढवले. यावेळी उपस्थित माता पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला.  सभेस शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content