Home प्रशासन फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी एपीआय संदीप पाटील यांची नियुक्ती 

फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी एपीआय संदीप पाटील यांची नियुक्ती 

0
31


फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहायक पोलीस निरीक्षक (API) संदीप रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, लवकरच एपीआय संदीप पाटील हे फैजपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत. या बदल्यांमध्ये सध्या रामानंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप रमेश पाटील यांची फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एपीआय संदीप पाटील यांना पोलीस प्रशासनातील कामाचा अनुभव असून, त्यांच्या नियुक्तीमुळे फैजपूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ते लवकरच आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारून पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले आहेत. या आदेशामुळे जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound