शिरपूर खान्देश तेली समाज मंडळाकडून अमृत चौधरी यांची शिवसेना शहरप्रमुख नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील तेली समाजातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक  अमृत चौधरी यांचे शिवसेना शिंदे गटाच्या पारोळा शहर प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांची शिवसेना शिंदे गटाच्या पारोळा शहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरपूर तालुका अध्यक्ष दिनेश अशोक चौधरी, उपाध्यक्ष किशोर देविदास चौधरी, सचिव राकेश चौधरी, जगदिश चौधरी, शिरपुर तालुका उपाध्यक्ष पारधी समाज नानाभाऊ दाभाडे, दिपक चौधरी, कैलास चौधरी, आनंद चौधरी, प्रितेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अमृत चौधरी यांच्या निवडीबद्दल खान्देश तेली समाज मंडळाच्या समस्त धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा येथील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा दिले.

Protected Content