होय…शिंदे गट न्यायालयात अपात्र ठरणारच ! : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पक्षांतर बंदी नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट असल्याने ते सर्व जण अपात्र ठरतीलच असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मोजक्या मात्र अचूक बोलण्यासाठी ख्यात असणारे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उध्दव ठाकरेंनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा देऊन घोडचूक केल्याचे वक्तव्य केले होते. अनेक विधीज्ज्ञांनी नंतर हीच बाब सांगितली होती. यानंतर आता त्यांनी शिवसेनेतील सत्तासंघर्षाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलतांना महत्वाचे वक्तव्य केले आहे.

याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, किमान दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन झालं पाहिजे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण, असं झालेलं नाही. त्यानंतर आता त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा तर्क दिला जात आहे. मात्र, आता ही घटना घडून गेलीय. अध्यक्षांनी ज्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा प्रतोद म्हणून मान्यता दिलीय. त्यांचा आदेश मोडलेला आहे. त्यामुळे व्हीप मोडला आहे, परिणामी, राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आलीय, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं शिंदे गटातील आमदार नक्कीच निलंबीत होणार असल्याचा दावा त्यांनी याप्रसंगी बोलतांना केला.

Protected Content