शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (व्हिडिओ)

jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. 3 सप्टेंबर रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, या आंदोलनात भारतातील शेतकऱ्यांना ऊणे अनुदान देऊन लुटले जात आहे. म्हणून शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जातून व थकीत वीज बिलातून मुक्त करण्यात यावे. तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कुठलेही निकष न लावता. लहान-मोठा शेतकरी असा भेदभाव न करता चालू पिक कर्ज रद्द करून नवीन पिकांसाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांना आर्थिक दुर्बल करणारे सरकार निबंध रद्द करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे. कापूस, वांगी, मोहरी, मका, ऊस आणि भात अशा अनेक पिकांच्या जीएम बियाण्यांच्या परवानगी देण्यात यावी. पुरेसे पाणी, वीज पुरवठा व्हावा. कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य देण्यात यावे व आंतरराष्ट्रीय व्यापारातील सरकारी हस्तक्षेप थांबवावा. शेतकरी किंवा शेतमजुरास साप चावल्याने त्याचा मृत्यु झाल्यास त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येकी व्यक्तीस मदत मिळावी अश्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content