माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या मुलाला अटक

50a97b6b3bf166eb871ced9cc2e1885a

 

बिलासपूर (वृत्तसंस्था) निवडणूक शपथपत्रात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

 

अमित यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र जोडले होते ते बनावट होते. सोबतच त्यांच्याकडून जन्माचे ठिकाण, दिवस आणि जात संदर्भात चुकीची माहिती भरण्यात आली होती. 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी दाखल करणाऱ्या महिला नेत्या समीरा पैकरा यांनी आरोप केला होता की, जोगींनी शपथपत्रात जन्माची तारीख, ठिकाण आणि जात याबद्दल खोटी माहिती दिली होती.

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर समीरा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने त्यावेळी याचिका फेटाळली होती. परंतु, याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात समीरा यांनी पुन्हा गौरेला येथील पोलिस स्टेशन गाठून जोगींच्या विरोधात तक्रार दाखल केली. निवडणुकीत अमित यांनी आपले जन्मस्थळ सारबहरा गाव गौरेला आणि जन्माचे वर्ष 1978 असे नमूद केले होते. प्रत्यक्षात त्यांचे जन्म वर्ष 1977 असून ते अमेरिकेतील टेक्सास येथे जन्मले होते असा दावा भाजप नेत्याने केला आहे. त्यानुसार आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत अमित जोगी यांना अटक केली आहे.

Protected Content