शेंदूर्णी गरुड महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक ठरले विविध पुरस्कारांचे मानकरी

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथिल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शेंदुर्णीच्या संचलीत अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालय शेंदुर्णी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले. 

यात रासेयो चे स्वयंसेवक  किरण कडुबा सुरवाडे या विद्यार्थ्यास शब्दगंध समूह औरंगाबाद तर्फे आयोजित स्पर्धेत राज्यस्तरीय ‘काव्यरत्न’ पुरस्कार तसेच बेटी फाउंडेशन वणी जि.यवतमाळ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार ऑनलाइन प्रदान करण्यात आला. रिंकू संजय कुंभार या विद्यार्थिनीस सुद्धा बेटी फाउंडेशन वणी जि.यवतमाळ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार ऑनलाईन प्रदान आला. यात दोघांना प्रशस्ती पत्र,मानचिन्ह व मेडल देण्यात आले.दोघ विद्यार्थ्यांना त्यांच्या काव्य-प्रतिभे बद्दल हा पुरस्कार देण्यात आला.त्यांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.श्याम जीवन साळुंखे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल बिहार पटणा येथील नीती आयोग मान्यता प्राप्त तसेच ओटाबू, लंडन, युनायटेड किंगडम (यु. के.) आयएसओ प्रमाणित मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या संस्थेचा ह्युमनीटेरियम एक्सलेन्स अवार्ड २०२० हा पुरस्कार बिहार सरकारचे, पर्यटन आणि खणन मंत्री मा. जिबेश  कुमार  यांच्याहस्ते  आणि मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्थेचे अध्यक्ष मा. रोहितकुमार सिंग यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन प्रदान करण्यात  आला.

डॉ. श्याम साळुंखे यांनी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबरोबर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या विविध  समाजोपयोगी कार्याबद्दल तसेच सेव्ह दी चिल्ड्रेन्स,आश्रम शाळेतील अनाथ मुलांना मदत तसेच युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे शिक्षण,आरोग्य, कोविड काळात प्रवासी मजु्रांसाठी आर्थिक मदत  ई. कार्यामुळे डॉ.साळुंखे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी युनिसेफ कडून “युनिसेफ गारडियन ऑफ होप” प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांना हा सन्मान मिळत आहे.

या विद्यार्थ्यांना व प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांना मिळालेल्या यापुरस्काराबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन मा.संजय गरुड, सचिव श्री सतीश काशिद, सहसचिव मा. दिपक गरुड, संस्थापदाधिकारी, प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय आणि  शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content