महिला दिनानिमित्त रन भुसावळ रॅलीचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील रेल्वे मंडळाच्या वतीने रन भुसावळ रॅलीचे आयोजन करण्यात आले.

आज भुसावळ मंडळ द्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस सप्ताहानिमित्त रन भुसावळ रॅली काढण्यात आली. ह्या मध्ये महिला कर्मचार्‍यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये महिला शक्ती, महिला सबलीकरण, महिलांच्या योगदानाबद्दल घोषणा देण्यात आल्या. यात मंडळ कार्यालयातील महिला आणि इतर कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

या रॅलीस डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. याप्रसंगी एडीआरएम मनोज सिन्हा , सीएमएस पी. के सामंत राय, सिनीयी डीपीओ एन. डी. गांगुर्डे सीनी यांच्यासह रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.रॅली ही डीआर एम कार्यालयातून गांधी पुतळा,शहर पोलीस स्टेशन,पाणी गेट मार्ग,स्टेशन रोड ने निघून रेल्वे व्हिआय पी सायडिंगला समारोप झाला. या वेळी डीआरएम गुप्ता यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सुत्र संचालन सिनी डिपीओ एन डी गांगुर्डे यांनी केले.

Protected Content