शशी थरुर यांनी पुन्हा केले मोदी यांचे कौतुक

download 1 4

तिरुअनंतपुरम, प्रतिनिधी | काँग्रेस नेते, खासदार शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मातृभाषा सोडून दररोज अन्य एका भारतीय भाषेतील शब्द शिकण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला असून त्याचे थरुर यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांनी दिलेले हे भाषेचे आव्हान मी स्वीकारले असून आता दररोज मी इंग्रजी, हिंदी आणि मल्ल्याळममध्ये ट्विट करणार असल्याचे ते म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना भाषा-भाषांमधील अंतर दूर करण्याच्या उद्देशाने सर्वांनाच एक सल्ला दिला. तुम्ही भाषणात मातृभाषा सोडून अन्य भारतीय भाषेतील शब्दाचा वापर करा. दररोज एक तरी अन्य भाषेतील शब्द शिका, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तोच धागा पकडत थरूर यांनी मार्मिक शब्दांत पंतप्रधानांच्या सल्ल्याचे स्वागत केले. एकप्रकारे हिंदीचे प्रभुत्व थोडे बाजूला सारणारेच हे आवाहन असून त्याचे मी अगदी आनंदाने स्वागत करत आहे व हे भाषा शिकण्याचे आव्हान स्वीकारून त्याचा नियमित अमल करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे थरूर म्हणाले.

Protected Content