एरंडोल, प्रतिनिधी । येथील मैत्र संघ फाउंडेशन तर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संकलन शिबिर घेण्यात येऊन जमा झालेल ट्रक भर धान्य व कपडे आतापर्यंत मदत न पोहोचलेल्या बहे या गावात घरोघर वितरित करण्यात आले. मैत्र संघाच्या कार्यकर्त्यांनी बहे गावात जाऊन पूरग्रस्तांना धीर देत त्यांना धान्य व कपडे , साड्या व रोख पैशांची मदत दिली.
एरंडोलच्या युवकांनी २ टन गहू, १ टन तांदूळ, २ क्विंटल ज्वारी, १ क्विंटल बाजरी, ४० किलो मसूर डाळ, २० किलो हरभरा दाळ, २० किलो साखर, १२०० ड्रेस, १२०० साड्या, व गरम कपडे इ. सामानाची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली. यावेळी पूरग्रस्तांना एरंडोलच्या युवकांना धीर दिला.सागर महाजन, पियुष चौधरी, करण पाटील, निखील शेंडे, पंकज पाटील , हेमंत पाटील, मनोज महाजन , शुभम महाजन, साहिल पिंजारी, संतोष जयस्वाल, तुषार महाजन, विनीत पाटील, कुलदीप पवार, हरिष चौधरी, रोहन महाजन, श्याम सिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, गौरव महाजन, आदित्य पाटील यांनी याकामी कामकाज पहिले.