जळगावातून इंग्लिश मीडियम शाळेतील तिजोरी लंपास

tijori chori

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील शिरसोली रोडवरील एल.एच़.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी चेअरमन यांच्या दालनातील तिजोरी लंपास केल्याची घटना आज (दि.३०) सकाळी उघडकीस आली. या तिजोरीत सुमारे २५ ते ३० हजार रूपयांची रोकड होती़. याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यात चार चोरटे तिजोरी घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.

 

एल़एच़पाटील शाळेत गुरूवारी मध्यरात्री १ वाजून २ मिनिटांनी चार चोरट्यांनी पाठीमागील गेटच्या बाजूने प्रवेश केल्यानंतर प्राचार्य, चेअरमन कार्यालय व त्यांच्या शेजारील दोन्ही कार्यालयांकडे मोर्चा वळवला़ नंतर कुलूप तोडून आत प्रवेश करुन सामानांची धासधूस केली़ तसेच चेअरमन यांच्या खोलीत विद्यार्थ्यांची फी ठेवलेली तिजोरीही चोरट्यांनी सोबत नेली़.

चोरटे तब्बल १६ मिनिटे शाळेच्या आवारात होते़, १ वाजून १८ मिनिटांनी चौघेही बाहेर पडले़. या सगळ्यांनी बरमुडा पँट घातली होती आणि तोंड रूमालाने झाकले होते. सकाळी स्कूलमधील एका कर्मचाऱ्याला चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांने प्राचार्यांना कळवले़. यावेळी प्राचार्य व चेअरमन खोलीमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते तर तिजोरी चोरीला गेल्याचे आढळून आले़. याबाबत विरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ आहे.

Protected Content