चौघुले प्लॉट गोळीबारप्रकरणातील अजून दोन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात आज दोघांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली. दोघांचा जामीन मंजूर केला आहे. 

विक्रम राजू सारवान वय ३२ व हेमंत विनोद धुसर वय ३० दोन्ही रा. गुरुनानक नगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. 

चौघुले प्लॉट येथे व्हॉटस्ऍपवर स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन तसेच जुना वाद उफाळून सारवान व शिंदे या दोन गटात वाद झाला होता. यावेळी दगडफेकीसह गोळीबाराची घटना घडली होती. यात एक जण जखमी झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात दंगल व आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोनू  सारवान, निलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित विजय जयवंत शिंदे , राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे तिघे. रा. चौघुले या तिघांना अटक केली होती. संशयित विजय शिंदे याच्याकडून गुन्ह्यात गोळीबारासाठी वापरण्यात आलेले दोन्ही गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.