जळगाव प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते जो आदेश देतील त्यानुसारच जळगाव लोकसभा मतदारसंघात युतीधर्माचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिली.
धरणगाव आणि चाळीसगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भाजपचे काम न करण्याचा ठराव संमत करून आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमिवर, आज लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने पक्षाचे महानगरप्रमुख शरद तायडे यांचे याबाबत मत जाणून घेतले. धरणगाव व चाळीसगावप्रमाणेच जळगावातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाहीत का ? अशी विचारणा केली असता शरद तायडे म्हणाले की, आमचे नेते सुरेशदादा जैन, उपनेते गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जे निर्णय घेतली त्याचेच पालन करण्यात येणार आहे. धरणगाव आणि चाळीसगावातील शिवसैनिकांनी घेतलेला पवित्रा हा स्थानिक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत उद्या नाशिक येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून यात मिळालेल्या निर्देशांनुसारच युतीधर्माचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहा : शरद तायडे यांचे युतीबाबतचे विचार.