शरद पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर !

तुळजापूर– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले असून आज ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

अलीकडे झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. ते थेट बांधावर जाऊन बळीराजची विचारपूस करणार आहेत. आज पहिल्या दिवशी ते तुळजापूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत आहेत.

पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. तर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नुकसानीची पाहणी सुरु केली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून पाहणी करणार आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे. या अनुषंगाने शरद पवार यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Protected Content