अनिल देशमुखांची शरद पवारांनी केली पाठराखण

नवी दिल्ली । परमबीर सिंग यांच्या पत्राच्या हेतूबाबत शंका व्यक्त करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्रातील प्रचंड गतीमान घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर आज दुपारी दिल्लीत शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यात ते काही तरी महत्वाचा निर्णय जाहीर करतील अशी शक्यता होती. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुख यांची जोरदार पाठराखण केली. यामुळे अनिल देशमुख यांना आता अभय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण देशमुख हे सचिन वाझे यांना कधीही भेटले नाही. तसेच सिंग यांनी एक महिन्यानंतर हे पत्र आताच का दिले याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचेही शरद पवार म्हणाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक महिनाभर शांत का बसले ? असा प्रश्‍न देखील Sharad Pawar यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांनी तपास करावा हे फक्त आपण सुचविले होते. यातील तपशीलात जाण्याचा आपला काहीही हेतू नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनिल देशमुख ज्या कालावधीत वाझे यांना भेटल्याचा आरोप करण्यात येत आहे. तेव्हा देशमुख हे कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे विलगीकरणात असल्याची माहिती देखील पवार Sharad Pawar यांनी दिली. तसेच, देशमुख यांच्या राजीनाम्याचा कोणताही प्रश्‍न नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणाची चौकशी हे उध्दव ठाकरे करतील असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या एटीएसचे कौतुक केले.काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र, मला आनंद आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर मुख्य प्रकरणाकडे दुर्लक्ष होताना दिसत होते, हा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित केला. यामुळे आता अनिल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत.

Protected Content