तरूणावर जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद असतांना शनीपेठ पोलीसांकडून कारवाई नाहीच !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ वाजता एका दुचाकीधारकाचा रस्ता आडवून जमावाने बेदम मारहाण करत डोक्यात फरशी टाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर तरूणाची दुचाकीवर मोठमोठे दगड टाकून नुकसान केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. असे असतांना देखील शनीपेठ पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

मुमराबाद रस्त्यावर चौघुले प्लॉट कॉर्नर नजीक रविवारी १७ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक दुचाकीस्वार जात असताना त्याला दोन जणांनी अडविले. तो थांबताच त्याच्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तो परिसरात इकडे तिकडे पळू लागला. त्यावेळी एका ठिकाणी त्याला पकडून त्याच्या डोक्यात फरशा टाकल्या. यातून कशीतरी सुटका करीत हा तरुण पळून गेला. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. हा तरुण ज्या दुचाकीवरून जात होता त्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दुचाकीस्वारावर हल्ला करताना या परिसरात असलेल्या सागर चौधरी यांच्या चारचाकी वाहनाचेदेखील नुकसान झाले. हल्ला करीत असताना समोर सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येतात हल्लेखोराने चेहऱ्यावर रुमाल बांधला व तेथून निघून गेले.

 

पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला केराची टोपली !

तरूणावर हा जीवघेणा हल्ला झाला हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. असे असतांना शनीपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार संवेदशनशील भागात पोलीसांनी गस्त वाढविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. परंतू पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे केराची टोपली दाखविली हात आहे. पोलीस कर्मचारी फक्त हजेरी लावण्यापुरता थातूर मातूर काम केल्याचे दाखवून दिवस पास केला जात आहे.

 

शनीपेठ पोलीसांचा धाक संपला !

शनीपेठ पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांची हप्त्यांसाठी गुन्हेगारीतील संशयितांचे लागेबांधे असल्याचे देखील बोलले जात आहे. यात दर महिन्याला पाकीट मिळाल्यानंतर पोलीस आपला जावाई म्हणून “गुन्हेगारी” परिसरात वाढतांना दिसून येत आहे. शिवाय या परिसरात अवैध दारू विक्री, सट्टा पत्ता आणि अवैध वाळू वाहतूकीकडे पोलीसांचे साफ दुर्लक्ष आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक संपल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

 

तरूणावर जीवघेणा हल्ला प्रकरणात कारवाईकडे जनतेचे लक्ष

चौघुले प्लॉट परिसरात दुचाकीधारकावर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला कोणत्या करणावरून झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ज्याला मारले तो तरूण घाबरून पळून गेला. पोलीस आल्याचे पाहून जीवघेणा हल्ला करणारे तरूण पसार झाले. आता नवीन पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला. असे सर्व असतांना या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढीची भूमीका काय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Protected Content