पाचोऱ्यात दिल्ली येथील जंतर मंतर घटनेचा निषेध

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथे दिल्लीतील जंतर -मंतर येथे धार्मिक द्वेष भडकवणाऱ्या मुस्लिम समुदायाला संपवण्याची मागणी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी पाचोरा पोलिसांना निवेदन देण्यात आले असून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

दिल्ली येथील जंतर मंतरवर भा.ज.पा. च्या उपाध्याय सह इतरांनी एकाच धर्माविरुद्ध घोषणा देऊन जणु काही दुसर्‍या फाळणीला जन्मदेत आहे असे वातावरण निर्माण करीत आहेत. एका विशिष्ट समाजाला लक्ष करून देशात धार्मिक विद्वेष निर्माण करुन त्या समाजाच्या नरसंहाराचे आवाहन करणारे हे समाज कंटक देशात आरजकता माजवु पहात आहे. ही घटना धर्मनिरपेक्ष भारतीय लोकशाहीला जागतिक पातळीवर काळीमा फासणारी आहे. भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता विधान मोडीत काढणारी आहे. यांच्या विरोधात पाचोरा पोलीसात भादवी १५३ (अ) कलमा खाली गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज एका शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्हा दाखलची मागणी केली. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटील, प्रविण ब्राह्मणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रवक्ते खलिल देशमुख, शहर अध्यक्ष अजहर खान, माजी नगराध्यक्ष नसीर बागवान, नगरसेवक अशोक मोरे, भिमराव खैरे, अझर मोतीवाला, मुस्लिम बागवान,  अॅड मंगेश गायकवाड, अॅड. अब्दुल वहाब, मतीन बागवान, जहीर खाटीक, साजीद खान, आफताफ खाटीक, अकील शेख, नंदलाल आगारे, रीयाज बागवान, हमीद शाह आदींनी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांना निवेदन देऊन तात्काळ गुन्हा दाखल ची मागणी केली.

 

Protected Content