Home Cities जळगाव रावेरातून ‘वंचित’तर्फे शमिभा पाटील यांना उमेदवारी

रावेरातून ‘वंचित’तर्फे शमिभा पाटील यांना उमेदवारी

0
145

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीने आज पहिली यादी जाहीर केली असून यात शमिभा पाटील यांना रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यातील अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जळगाव जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांना रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या ट्रान्सजेंडर असून पक्षाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. दरम्यान, या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील विधानसभेचा पहिला उमेदवार घोषीत करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound