नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माझ्या मुलांचे कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झाले तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालते? तर लोक त्यांना मत देतात, ज्या दिवशी लोक ठरवतील. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत. त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहणार नाही, कुणाचा मुलगा किंवा मुलगी असणे यात काही पाप किंवा पुण्य नाही. पण त्याने स्वत:ला सिद्ध करायला हवे, त्यानंतर लोकांनी म्हटले पाहिजे, तुमच्या मुलाला निवडणुकीला उभे करा. नागपुरातील आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.
वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व माननारी आपली संस्कृती आहे. आपण म्हणतो, विश्वाचे कल्याण होवो. आपण कधीच आपले कल्याण, मग आपल्या मुलांचे कल्याण आधी होवो, असे म्हणत नाही. पण राजकारणात काही लोक असे म्हणतात. हे उदाहरण देऊन नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली.तर मागील ४५ वर्षात एअरपोर्टवर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येते. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही कारण हे मला आवडत नाही. मी जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसतंय ते त्यामुळे आहे.